शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पतीशी वाद झाल्याने पत्नीची मुलीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या, मालगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:06 IST

मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली

मिरज : मालगाव (ता. मिरज) येथून बेपत्ता झालेल्या माय-लेकींनी कृष्णा नदीत आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह म्हैसाळ व रायबाग येथे नदीपात्रात सापडले. पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने दीपाली अमित खांडेकर (वय ३५) व प्राची अमित खांडेकर (वय १६) या मायलेकींनी टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मालगाव ग्रामपंचायतीकडे कर्मचारी असलेले अमित खांडेकर यांचे वीस वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या दीपाली हिच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्यास एक मुलगा व मुलगी प्राची अशी दोन अपत्ये होती. प्राची नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली होती. घरात पतीशी किरकोळ वाद झाल्याने दीपाली यांनी प्राचीला सोबत घेऊन रविवारी १५ जून रोजी घर सोडले. याबाबत पती अमित खांडेकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी दोघींचा शोध सुरु केला. यावेळी मिरजेत कृष्णाघाट परिसरात दोघी मायलेकी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या. यामुळे पोलिसांनी व रेस्क्यू फोर्सच्या मदतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली. मात्र दोघी सापडल्या नसल्याने शोध मोहीम थांबली. दि. २० जून रोजी मुलगी प्राची खांडेकर हीचा मृतदेह कर्नाटकात रायबाग येथे कृष्णा नदीपात्रात मिळाला. तिच्या नातेवाइकांचा शोध लागला नसल्याने तिच्यावर रायबाग येथेच पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर गुरुवारी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिराजवळ कृष्णा नदीपात्रात वाहत्या पाण्यात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह दिसला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मायलेकींनी मिरजेत कृष्णाघाट येथून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. दोघींच्या आत्महत्येमुळे मालगाव परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.