शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साबण आणून देऊन दमताय का? पत्नीने पक्कडने पतीचा अंगठा फोडला, सांगलीतील घटना

By संतोष भिसे | Updated: May 14, 2024 18:35 IST

सांगली : बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवलाय? असे विचारले म्हणून पती-पत्नीत उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. पतीने पत्नीच्या थोबाडीत ...

सांगली : बाथरुममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवलाय? असे विचारले म्हणून पती-पत्नीत उद्भवलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. पतीने पत्नीच्या थोबाडीत मारली, तर पत्नीने पक्कडने पतीचा अंगठा फोडला. यासंदर्भात पतीच्या फिर्यादीवरुन पत्नीसह सासरच्या चौघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सांगलीत संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये ८ मे रोजी दुपारी एक वाजता ही घटना घडली. पोलिस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा दाखल झाला. अशोक मारुती चौगुले (वय २५, रा. इंगळे गल्ली, पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी विद्या (वय १९), सासरा बाळू आप्पा कोळेकर, सासू लक्ष्मी, चुलत सासरा ज्ञानू आप्पा कोळेकर (सर्व रा. पाटणे प्लॉट, संजयनगर) यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. 

अशोक हमाली करतात. पत्नी व सासरच्या नातेवाईकांसोबत एकत्र राहण्यास आहेत. ८ मे रोजी सकाळी पत्नी विद्या अंघोळीसाठी स्वच्छतागृहात जाताना तिने पतीला साबण कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर अशोक यांनी साबण बाथरुममध्ये असेल, जाऊन बघ असे सांगितले. तेव्हा विद्या हिने पतीला अपशब्द वापरले. तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का? अशी प्रतिविचारणा केली. त्यावरुन पती-पत्नीत वाद झाला.अशोकने विद्याला शिवी दिली, तर विद्याने अशोकच्या हाताच्या अंगठ्यावर पक्कडने वार केला. या भांडणावेळी सासू, सासरे, चुलत सासरे यांनीही अशोकला दमदाटी केली. मुलीला त्रास देतोस, तुला सोडतच नाही असे धमकावले. अशोकच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस