शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चारित्र्यावर संशयावरून लाकडाने मारहाण करून पत्नीचा खून, आरोपी पतीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:16 IST

विवाहितेच्या भावाची पोलिसांत फिर्याद

आटपाडी : निंबवडे (ता. आटपाडी) येथे चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) यास अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे याच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. संबंधित कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.दि. १९ मार्च रोजी सकाळी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, नातेवाइकांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला होता. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. या वेळी मंगल वाघमारे हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी तसेच इतर नातेवाईक धावत घटनास्थळी गेले.

मोबाइलच्या उजेडात पाहिले असता अंकुश वाघमारे हा मंगल हिला लाकडाने मारहाण करत असल्याचे दिसून आले. नातेवाइकांना पाहताच तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत मंगल हिला निंबवडे गावात आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मंगल वाघमारे हिला मृत घोषित केले. त्यानंतर आटपाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

आरोपीला विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करत आहेत. या प्रकरणी पप्पू अंतू जाधव (वय ३० रा. अंतुले, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Husband arrested for murdering wife over suspicion of infidelity.

Web Summary : In Sangli, a husband killed his wife with a wooden log, suspecting her character. The Atpadi police arrested the accused husband. The incident occurred in Nimbavade village. Investigations are underway.