विधवा महिलेची चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:14+5:302021-02-05T07:24:14+5:30
भारती माळी यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानंतर भारती या मिरजेत भावाच्या घरात राहत आहेत. पतीची ...

विधवा महिलेची चार लाखांची फसवणूक
भारती माळी यांच्या पतीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानंतर भारती या मिरजेत भावाच्या घरात राहत आहेत. पतीची अथणी येथील शेती विकून आलेली रक्कम त्यांनी मिरजेत बँक ऑफ इंडिया शाखेत त्यांच्या खात्यावर ठेवली होती. भावाच्या घरात भाड्याने राहणाऱ्या तेजस्विनी अनिल तलवारे हिच्यासोबत त्यांची ओळख झाली. भारती या अशिक्षित असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तेजस्विनी तलवारे हिने त्यांना घरकुल योजना व विधवा पेन्शन योजना मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी भारती यांचे बँकेचे पासबुक घेऊन वेळोवेळी बँकेत आपले काम आहे, असे सांगून त्यांना दुचाकीवरुन बँकेत नेले. १३ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी ३ लाख ९५ हजार रुपये भारती यांच्या सहीने बँक खात्यातून काढून घेतले. भारती या भावाच्या घराच्या बांधकामासाठी २ लाख रुपये काढण्यासाठी बॅकेत गेल्यानंतर खात्यात केवळ पाचशे रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भारती माळी यांनी तेजस्विनी तलवारे हिच्याविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलीस हवालदार बळीराम पवार यांनी तलवारे अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर तिला चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.
फाेटाे : २५ तेजस्विनी तलवारे