सांगली काॅलेज कार्नर चौकाचे रुंदीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:47+5:302021-05-03T04:21:47+5:30
ओळी : शहरातील काॅलेज काॅर्नर चौकाच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे) लोकमत न्यूज नेटवर्क ...

सांगली काॅलेज कार्नर चौकाचे रुंदीकरण सुरू
ओळी : शहरातील काॅलेज काॅर्नर चौकाच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील सर्वात वर्दळीचा चौक असलेल्या काॅलेज काॅर्नर चौकाच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. बऱ्याच वर्षांपासून या चौकाच्या रुंदीकरणाची मागणी होत होती. अखेर या चौकाच्या रुंदीकरणाला मुहूर्त मिळाला आहे.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी चौक सुशोभीकरण व रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, आतापर्यंत सिव्हिल चौकासह अनेक चौकांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. काही चौकाचे सुशोभीकरणही पूर्ण झाले आहे. काॅलेज कार्नर चौकाच्या रुंदीकरणाची मागणी होत होती. हा चौक सर्वात वर्दळीचा आहे. या चौकात दोन महाविद्यालये आहेत, तसेच तासगाव, इस्लामपूरला जाण्यासाठी याच चौकातून जावे लागते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडीही होत होती.
चौकातील टिंबर एरिया बाजूला वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर होता. काही दिवसांपूर्वी तो हटविण्यात आला, तसेच विद्युत खांबही बाजूला करण्यात आले. आता प्रत्यक्षात चौक रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. लवकरच या चौकाचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.