वाळव्यातील राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधणारे विजयबापू पाटील काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:27 AM2021-04-10T04:27:13+5:302021-04-10T04:27:13+5:30

बोरगाव : राष्ट्रवादीची वाळवा तालुक्यातील राजकीय भूमिका ही जयंत पाटील ठरवतात. असे असताना राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधणारे वाळवा ...

Why Vijaybapu Patil who tied the NCP's sledgehammer in the desert? | वाळव्यातील राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधणारे विजयबापू पाटील काेण?

वाळव्यातील राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधणारे विजयबापू पाटील काेण?

Next

बोरगाव : राष्ट्रवादीची वाळवा तालुक्यातील राजकीय भूमिका ही जयंत पाटील ठरवतात. असे असताना राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधणारे वाळवा तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील हे कोण? कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपच्या सुरेश भोसले यांना असल्याचे सांगत त्यांनी पक्ष व जयंत पाटील यांना बदनाम करून जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग चालविला आहे, अशी टीका राजारामबापू पाटील सूतगिरणीचे संचालक उदयसिंह शिंदे यांनी केले.

बोरगाव (ता. वाळवा) येथील शिंदे मळ्यात कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, अविनाश मोहिते हे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस आहेत, तर जयंत पाटील हे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे सत्ताधारी भाजपच्या भोसले गटाच्या विरोधात आहाेत. असे असताना जयंत पाटील यांच्या पाठीमागे विजयबापू पाटील यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करणे हा बालिशपणाच आहे.

विजयबापू पाटील हे जयंत पाटील यांच्यावर भोसले कुटुंबाने केलेले आघात विसरले असावेत. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर प्रथम आमदार म्हणून १९८० ला उभारणार हाेते. त्यावेळी जयवंतराव भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जयंत पाटील यांचे वय कमी आहे असे सांगत त्यांचा जन्मतारखेचा दाखला देऊन त्यांचे पाच वर्षे राजकीय खच्चीकरण केले. जयंत शुगर पेठनाक्यावर उभा करण्याचा भोसलेंचा घाटही ते विसरले का? पुत्र प्रेमापोटी वाळवे तालुक्यातील २ हजार कामगारांच्या कुटुंबांचे मतदान कराड तालुक्यात भाजपचे आमदार होण्यासाठी केलेला अयशस्वी प्रयत्नही ते विसरले का?

जयंत पाटील यांची भूमिका विजय पाटील यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवरून जाहीर करू नये. राष्ट्रवादी पक्षाला व जयंत पाटील यांना नाहक बदनाम करू नये. आम्ही राष्ट्रवादीचे युवक व पदाधिकारी जयंत पाटील यांना भेटून विजयबापू पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहाेत.

यावेळी राष्ट्रवादीचे नेर्ले पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, शिवराज जाधव, संभाजी दमामे, वसंत पाटील, महेश पवार, केदार शिंदे उपस्थित होते.

Web Title: Why Vijaybapu Patil who tied the NCP's sledgehammer in the desert?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.