शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

संजय पाटलांचा कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का?, भाजपकडून खासदारांना घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 17:06 IST

'कवलापूर विमानतळासाठी जनआंदोलन उभारणार'

सांगली : मणेराजुरी, अलकुड येथील एमआयडीसीला खासदार संजय पाटील यांनी विरोध केला. त्या परिसरात प्रदूषण वाढण्याची भीती त्यांना आहे. मग कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का, असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत उपस्थित केला. कवलापूर विमानतळासाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणाही यावेळी केली.कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी पत्रकार बैठकीत पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांनी भूमिका मांडली. पवार म्हणाले की, कवलापूर येथील जागेत विमानतळ व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. पण काहींनी ही जागा हडपण्याचा डाव आखला आहे. खा. पाटील यांचा मणेराजुरी, अलकुड एमआयडीसीला विरोध आहे. पण कवलापुरात एमआयडीसीसाठी ते हट्ट करीत आहेत. एमआयडीसी झाल्यास या परिसरातील लोकांचे आरोग्य बिघडणार नाही का? कमी किमतीत जागा घेऊन जादा दराने विकण्याचे ‘ब्लॅक मार्केटिंग’ सुरू असल्याचा आरोप केला.साखळकर म्हणाले की, कवलापूर विमानतळासाठी ११२ एकर जागा घ्यावी लागणार आहे. सध्या धावपट्टीसाठी आरक्षित जागेवर बांधकामे झालेली नाहीत. त्यामुळे भूसंपादन होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग, व्यवसायासाठी गायरान जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. उद्योजकांनी त्या जमिनीवर उद्योग उभारावेत. कवलापूरच्या जागेत विमानतळ व्हावे, यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडणार आहोत.नितीन शिंदे म्हणाले की, कवलापूर विमानतळासाठी निवेदने, धरणे, निदर्शने, रास्ता रोको, सांगली बंद आंदोलन करणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार आहोत. कोणत्याही स्थितीत कवलापुरात विमानतळ झाले पाहिजे, अशी मागणी केली.

सांगली स्पाईस एक थोतांडसांगली स्पाईस संघटना एक थोतांड आहे. यातील बहुतांश लोकांना विमानतळाची जागा हडप करायची आहे. या संघटनेतील ३५० लोक कोण आहेत? त्यांनाच उद्योग का उभारायचा आहे. यातील अनेकांनी मार्केट यार्डाची सावळीतील जागा घेतली आहे. काहींनी वसमत येथे उद्योग सुरू केले आहेत. जिल्ह्यात कोण उद्योजक होणार, हे ठरविणारे सुरेश पाटील व सतीश मालू कोण, असा सवाल पृथ्वीराज पवार यांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाAirportविमानतळMIDCएमआयडीसी