गाडी का दिली नाहीस, म्हणून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:40+5:302021-01-13T05:08:40+5:30
सांगली : शहरातील मार्केट यार्डसमोर गाडी का दिली नाहीस, तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत एकास काठीने मारहाण करण्यात ...

गाडी का दिली नाहीस, म्हणून एकास मारहाण
सांगली : शहरातील मार्केट यार्डसमोर गाडी का दिली नाहीस, तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत एकास काठीने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शैलेश चंद्रशेखर दरूरमट (रा. तारा निवास, मार्केट यार्डसमोर, सांगली) यांनी अखिलेश महेश दरूरमट, महेश लक्ष्मेश्वर दरूरमट, गिरीजा महेश दरूरमट आणि आकांक्षा महेश दरूरमट यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी शैलेश, त्यांची पत्नी व भाऊ दुकानात बसले असताना, संशयित हातात काठी घेऊन आले व त्यांनी, मला गाडी का दिली नाहीस, तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत शैलेश यांना जिवंत ठेवत नाही म्हणत हाताने व काठीने मारहाण केली. तसेच इतर संशयितांनीही तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत १० हजार रुपयेही घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.