शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेढ नसताना जतला पोलीस फौजफाटा कशाला?, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:11 IST

शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी

जत : कोणतीही जातीय, राजकीय दंगल, खून, मारामारी असा कोणताही प्रकार घडला नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा पोलीस फौजफाटा जत शहरात तैनात केला आहे. शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच ही वसुली करुन घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसविला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला त्यांचे विचार पटले नाहीत. त्यामुळे आम्ही बैठक सोडून बाहेर आलो. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनापरवाना मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. तासगाव आणि विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघात मूर्ती बसविण्यात आली आहे.कदम व त्यांचे नातेवाईक आ. विक्रम सावंत यांनी प्रशासनावर दबाव टाकल्याने शिवाजी पुतळा उभारणीत आडकाठी आणली गेली. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण तीन उपाधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, यासह बाराशे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. कोणतीही राजकीय दंगल, खून, मारामारी असे प्रकार झाले नसताना शहराला छावणीचे स्वरूप देण्यात आले आहे.

ते म्हणाले की, कोरोना काळात विविध वैद्यकीय उपचारांसाठी कोट्यवधींचा खर्च दाखविला आहे. याला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमुळे पोलीस बंदोबस्तावर शासनाचा दीड ते दोन लाख खर्च पडत आहे. हा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. मी स्वतःच्या हिमतीवर दोन वेळा कारखान्यावर, बँकेवर व आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे राजकीय स्टंट करण्याचा संबंधच येत नाही. उलट जिल्हा बँकेत पराभव झाल्याने अस्तित्व संपण्याची भीती वाटत असल्याने आ. सावंत माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.

जयंतरावांच्या भेटीनंतर पुढील निर्णय

शिवाजी पुतळ्याबाबत वर्गणी गोळा करायला वेळ लागला, त्यामुळे पुतळ्याचे काम रखडले. हे आम्ही मान्य करतो. मात्र, आमदार सावंत यांनी एका पैशाचीही मदत या पुतळ्यासाठी दिली नाही. पुतळा बसवू नये यासाठी पोलिसांचा प्रचंड दबाव आला आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरेल, असे जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज