शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

तिसऱ्या आघाडीचा धक्का कोणाला?

By admin | Updated: October 28, 2016 23:58 IST

इस्लामपूर नगरपालिका निवडणूक : ‘विश्वासा’वर लावलेला कौल

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी विकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने कंबर कसली असून, शहरातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी केली आहे. अचानक रिंगणात उतरलेल्या तिसऱ्या आघाडीचा धक्का कोणाला बसणार, याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची इस्लामपूर पालिकेतील राष्ट्रवादीवर मांड आहे. मात्र त्यांचे कट्टर समर्थक निशिकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच विरोधी गटात प्रवेश केला. निशिकांतदादांसारखा तगडा उमेदवार हाताशी येताच विरोधी आघाडीनेही लगोलग त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून टाकली. या धक्क्यासोबत आ. पाटील यांचे विश्वासू सहकारी दिलीपतात्या पाटील यांनीही विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीवर तोफ डागली. याची जोरदार चर्चा सुरू असतानाच नगरपालिकेच्या निवडणुकीत डाव्या विचारांच्या तिसऱ्या आघाडीने उडी घेतली आहे. कासेगाव येथील मानवाधिकार संघटनेचे अनिल माने, कॉम्रेड धनाजी गुरव आणि बळिराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांनी तिसऱ्या आघाडीच्या रूपाने सर्वांच्या गुरूस्थानी असलेले माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन तिसऱ्या आघाडीची उंची वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचार्य सायनाकर यांच्या उमेदवारीची सर्वसामान्यांतून चर्चा सुरू झाली आहे. आधीच निशिकांतदादा पाटील यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीने चांगलाच धसका घेतला आहे. राष्ट्रवादीकडून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्या नावांबाबत चाचपणी सुरू आहे. त्यातच प्राचार्य सायनाकर यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे, अभ्यासू व जनमानसात आदर असलेले व्यक्तिमत्त्व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मानवाधिकार पक्षाचे अनिल माने यांनी कऱ्हाड, इस्लामपुरात कार्यालये स्थापन करून तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर आणला आहे. माने यांनी डाव्या विचारांच्या मंडळींसह गत विधानसभा निवडणूक लढवलेल्या बी. जी. पाटील यांच्याशी हातमिळवणी करून, स्वच्छ प्रतिमेचे माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या रूपाने राष्ट्रवादी आणि निवडणुकीपुरते एकत्र आलेल्या विकास आघाडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीबाबत शहरामध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच स्पर्धा नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून विजयभाऊ पाटील, विकास आघाडीकडून निशिकांतदादा पाटील, तिसऱ्या आघाडीकडून विश्वास सायनाकर हे दिग्गज उमेदवार प्रथमच मैदानात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होणार असल्याचे दिसत आहे.