शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील इस्लामपूर, शिराळ्यामध्ये भाजपचा गॉडफादर कोण?, निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:21 IST

२०२४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार, असा दावा

अशोक पाटीलइस्लामपूर : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना भाजपने दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही. अखेर नाईक यांनी भाजपला रामराम ठोकला. आता इस्लामपूर, शिराळा मतदारसंघात भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना २०२४ च्या रणांगणात उतरण्यासाठी वरिष्ठ नेते आश्वासन देत आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपचा गॉडफादर कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत मंत्रिपद दिलेच नाही. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले.गत विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाचे उमेदवार सम्राट महाडिक यांनी ५० हजारांहून अधिक मतदान मिळवून ताकद दाखविली. म्हणूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक यांना २०२४ च्या विधानसभेच्या तिकिटासाठी ग्वाही दिल्याचे महाडिक समर्थक मानतात. परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शिराळा मतदारसंघात येऊन सत्यजित देशमुख यांनाच २०२४ ची उमेदवारी मिळेल, असे जाहीर करून देशमुख -महाडिक समर्थकांत संभ्रम निर्माण केला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना गत इस्लामपूर मतदारसंघ निवडणुकीत भाजपची उमेदवारी देणार म्हणून वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले होते. परंतु युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने पाटील यांना बंडखोरी करावी लागली. २०२४ च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपलाच मिळणार, असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळेच निशिकांत पाटील आतापासूनच विधानसभेची तयारी करत आहेत. नव्या युतीत इस्लामपूर मतदारसंघ कोणाकडे जाणार, यावर प्रश्नचिन्ह आहे.  तरीही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.   दोन्ही मतदारसंघात गॉडफादर नसल्याने भाजपची राष्ट्रवादीपुढे फरफट होत चालली आहे.एकनाथ शिंदे यांचे पवारांना पाठबळजिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे गॉडफादर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे पवार यांनी गॉडफादरच्या ताकदीवर इस्लामपूर मतदारसंघावर दावा केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपा