शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष

By घनशाम नवाथे | Updated: May 3, 2024 21:49 IST

कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती. या खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आली होती. या खटल्याच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. परंतु, याचवेळी उज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे.

सांगली : संपूर्ण देशभर गाजलेल्या अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा खटला चालवणारे विशेष सरकारी वकील उज्वल निकम भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोथळे खून खटल्यात आता विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची नियुक्ती होणार? याकडे लक्ष लागले आहे.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये चोरीच्या संशयावरून अनिकेत कोथळे याला ताब्यात घेतली होते. त्याला पोलिस कोठडीत मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर तत्कालीन उपनिरीक्षक युवराज कामटे व सहकाऱ्यांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळून पुरावा नष्ट केला. खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यांनी खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली. ‘सीआयडी’कडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी तपास करून युवराज कामटे याच्यासह कर्मचाऱ्यांविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती झाली होती. या खटल्याची सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आली होती. या खटल्याच्या निकालाची उत्सुकता वाढली होती. परंतु, याचवेळी उज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात २९ खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये सांगलीतील कोथळे खून खटल्याचा समावेश होता. आता त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे या खटल्यात पुढे काय होणार? याची उत्सुकता वाढली आहे. राज्य शासनाकडून आता या गाजलेल्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य शासनाकडून खटल्यात विशेष सरकारी वकील नियुक्त न झाल्यास जिल्हा सरकारी वकिलांच्या पॅनलवरून वकिलांची नियुक्ती करावी लागेल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

उज्वल निकम यांचा चौथा खटला-सन १९९८ मध्ये सांगलीत झालेल्या अमृता देशपांडे खून खटल्यात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर मिरजेतील रितेश देवताळे खून खटल्यात दुसऱ्यांदा नियुक्ती झाली. हिवरे येथील तिहेरी खून खटल्यात तिसऱ्यांदा, तर अनिकेत कोथळे खून खटल्यात चौथ्यांदा नियुक्ती झाली होती. यापूर्वीच्या तिन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमSangliसांगलीElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४