माझी उमेदवारी ठरवणारे ते कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:46+5:302021-03-13T04:48:46+5:30

निवास पवार लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : मला उमेदवारी द्यायची की नाही हे संस्थापक पॅनेल ठरवेल, ते ठरवणारे कोण? ...

Who decides my candidacy? | माझी उमेदवारी ठरवणारे ते कोण?

माझी उमेदवारी ठरवणारे ते कोण?

निवास पवार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : मला उमेदवारी द्यायची की नाही हे संस्थापक पॅनेल ठरवेल, ते ठरवणारे कोण? संस्था निकोप चालवायची असेल तर दोघांचे विचार एक असावे लागतात. भिन्न विचाराचे लोक एकत्रित येतीलच कसे? त्यामुळे इंद्रजित मोहिते यांच्याशी युतीचा प्रश्नच येत नाही, असे कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनेल व रयत पॅनेल यांच्यातील आघाडीची सध्या चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी भाजपची सत्ता घालविण्यासाठी आपण मागे-पुढे सरण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

महाविकास आघाडीबाबत संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते म्हणाले की, युती दोन समविचारी लोकांची होते. ज्यांचे विचारच भिन्न आहेत त्यांच्याशी कशी युती होणार? २०१५ च्या तिरंगी लढतीत सर्वाधिक मतदान मला झाले होते. माझ्या पॅनेलच्या सहा जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. यंदाही आम्ही कोणाला उमेदवारी द्यायची, किती व कोणत्या जागा लढवायच्या हे संस्थापक पॅनेल ठरवेल. डॉ. इंद्रजित मोहिते यांचा हस्तक्षेप कशासाठी? निवडणुकीत सभासद कोणाच्या पाठीशी आहेत, हे इंद्रजित मोहिते यांना समजायला हवे.

चौकट

राजकारण आहे भाऊ!

अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यात आघाडीची शक्यता सध्या तरी दिसत नाही. परंतु राजकारणात कधी कोण-कोणाचा मित्र व शत्रू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे तिरंगी की दुरंगी, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Who decides my candidacy?