शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : भाजपची उमेदवारी कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:30 IST

इस्लामपूर : महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात उमेदवारीसाठी पाच नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. भाजपची गोपनीयता शिगेला पोहोचली आहे,तर इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला कधी जातो आणि आपल्याला उमेदवारी कधी मिळते, याची प्रतीक्षा जिल्हाप्रमुखांना लागून राहिली आहे.

ठळक मुद्दे Maharashtra Vidhan Sabha 2019 : भाजपची उमेदवारी कोणाला?महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच नेत्यांना प्रतीक्षा

अशोक पाटील इस्लामपूर : महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात उमेदवारीसाठी पाच नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. भाजपची गोपनीयता शिगेला पोहोचली आहे,तर इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला कधी जातो आणि आपल्याला उमेदवारी कधी मिळते, याची प्रतीक्षा जिल्हाप्रमुखांना लागून राहिली आहे.इस्लामपूर मतदार संघात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. निशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले आहे.

दुसरीकडे हुतात्मा संकुलाचे गौरव नायकवडी यांच्या समर्थकांनी भाजपच्या उमेदवारीसाठी मुंबई येथे ठाण मांडले आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी, कोणत्याही परिस्थितीत आपणास उमेदवारी देऊ, असा शब्द दिल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नायकवडी यांनी इस्लामपूर, आष्टा शहरात लक्ष केंद्रित केले आहे. आता भाजपकडून ए फॉर्म या दोघांपैकी कोणाला मिळतोय, याकडे लक्ष लागून राहिले आहे.महायुतीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मित्रपक्षाला काही जागा सोडण्यात आल्या आहेत. इस्लामपूर मतदारसंघ रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत जे नाव सुचवतील, त्यांना उमेदवारी देण्यात येईल, असेही सांगितले जात आहे. त्यामध्ये गौरव नायकवडी यांचे नाव आघाडीवर आहे. अशीच परिस्थिती शिराळा मतदार संघात आहे.

काँग्रेसमधून सत्यजित देशमुख भाजपमध्ये दाखल झाले. आता उमेदवारी विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक की देशमुख यांना असा प्रश्न आहे. या निर्णयात महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक अडसर ठरत आहेत. महाडिक यांनी यावेळची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेथे उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीvidhan sabhaविधानसभा