शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार 'आयुष्मान कार्ड'; ओमप्रकाश शेटे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:58 PM

आयुष्मान योजनेचे कार्ड काढण्यात शहरापेक्षा ग्रामीण भाग आघाडीवर

सांगली : केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेच्या कार्डचा लाभ मिळत आहे. आता पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांनाही आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढता येणार आहे. या योजनेत सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ८९.४३ टक्के तर महापालिका क्षेत्रात ७२.५७ टक्के नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक जागरूक असल्याचे दिसत आहे, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ. शेटे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, केंद्र सरकारकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. या योजनेतून लाभार्थ्याला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. योजनेचा केसरी, पिवळ्या रेशनकार्डधारकांबरोबरच आता पांढरे रेशनकार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. यामध्ये शासकीय नोकरदार असले तरीही ते आयुष्मान कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी लाभ घ्यायचा काही नाही ते त्यांनी ठरवायचे आहे.या योजनेत सांगली जिल्ह्यानेही आघाडी घेतली असून ८९.४३ टक्के नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शहरातील नागरिकांकडे सर्व सुविधा असतांनाही आयुष्मान कार्ड काढण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून १०० टक्के आयुष्मान कार्ड झाले पाहिजेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.

राज्यात १३५० रुग्णालयेमहाराष्ट्रात एक हजार ३५० रुग्णालयांमध्ये आयुष्मान कार्डधारकांना १०० टक्के मोफत उपचार मिळणार आहेत. काही रुग्णालयांच्या अडचणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या पॅकेजची रक्कम पाच वर्षांत वाढविली नाही. यामध्ये वाढ करण्यासह योजनेचा अभ्यास करण्यासाठी १०२ डॉक्टरांचे राज्यात समिती गठीत केली आहे. समिती सखोल अभ्यास करून योजनेतील त्रुटी दूर करणार आहे, असेही डॉ. शेटे म्हणाले.

'सिव्हील'ची तपासणी करणारसांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयाचा कारभार समाधानकारक नाही. बैठकीलाही जिल्हा अधिष्ठातासह प्रमुख डॉक्टर गैरहजर होते. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून डॉ. शेटे यांनी 'सिव्हील'ला अचानक भेट देऊन पंचनामा करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल