कुजबूज...‘उलटा चोर...कोतवाल को...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:16+5:302021-07-02T04:18:16+5:30

पोलिसांसमोर कधी आपली अक्कल पाजळू नये म्हणतात ते काही खोटं नाही.. नेमका हाच प्रसंग दोन तरुणांना चांगलाच अंगलठ आला. ...

Whispers ... ‘Ulta Chor ... Kotwal Ko ...’ | कुजबूज...‘उलटा चोर...कोतवाल को...’

कुजबूज...‘उलटा चोर...कोतवाल को...’

पोलिसांसमोर कधी आपली अक्कल पाजळू नये म्हणतात ते काही खोटं नाही.. नेमका हाच प्रसंग दोन तरुणांना चांगलाच अंगलठ आला. शहरात सध्या कडक तपासणी सुरू असून, विश्रामबाग परिसरातील एका चौकात पोलिसांनी दोन तरुणांना अडवले व लायसन्सची मागणी केली. मुळात हनुवटीवरच मास्क घेऊन असलेल्या या दोघांपैकी एकाने थेट मोबाइल काढून शुटिंग सुरू केले. पोलीस त्याला सांगत असतानाही त्याचा तोरा कायमच होता. मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणार असल्याचेही बोलत होता. नेमके इतर पोलीस कर्मचारीही तिथे दाखल झाले आणि त्यांना थेट पोलीस ठाण्यात घेऊन आले. यावेळी अधिक चौकशी केली असता, दोघांचेही वय १७ वर्षे असल्याने वाहन परवाना असण्याचा प्रश्नच नसताना ‘उलटा चोर..’म्हणीप्रमाणे पोलिसांवर गुरगुरणाऱ्या या तरुणाची चांगलीच पंचाईत झाली व शेवटी त्याने माफी मागितल्यावर हे प्रकरण शांत झाले.

Web Title: Whispers ... ‘Ulta Chor ... Kotwal Ko ...’