शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढताना वृद्धेने घेतले पेटवून, मिरजेतील धक्कादायक प्रकार; महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:41 IST

या घटनेमुळे महापालिका पथकाची धावपळ उडाली

मिरज : मिरजेत मालगांव रस्त्यावर , खोतनगर सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकासमोर सुमन मनोहर वाघमारे या वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. याप्रकरणी संबंधित महिलेसह दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याच‍ा गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. मिरज-मालगांव रस्त्यावर खोतनगर गल्ली क्रमांक चार येथे सुमन वाघमारे, सुरेश वाघमारे यांनी महापालिकेच्या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केल्याची तक्रार आहे.हे अतिक्रमण हटविण्यासाठी मिरज सुधार समितीने आंदोलनाचा इशारा दिल्याने सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी बुधवार सकाळी साडे अकरा वाजता अतिक्रमण हटविण्यास गेले होते. यावेळी यावेळी सुरेश वाघमारे महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून गेले. तर सुमन वाघमारे यांनी जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरुन पेट्रोल आणून अंगावर ओतून पेटवून घेतले. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी अंगावर पाणी ओतून आग विझविली. यात सुमन वाघमारे या सुमारे २५ टक्के भाजल्या आहेत. जखमी सुमन वाघमारे यांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महापालिका पथकाची धावपळ उडाली. कारवाई न करताच महापालिका पथक परत गेले.

सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार यांनी शहर पोलिसात सुमन वाघमारे व सुरेश वाघमारे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद दिली आहे. तर महापालिका शहरातील अधिकारी मोठी अतिक्रमणे न काढता सुधार समितीची सुपारी घेऊन गरिबांची घरे पाडत असल्याचा आरोप सुमन वाघमारे व सुरेश वाघमारे यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीfireआगWomenमहिला