शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election: पक्ष विचारमंथनात, इच्छुक उतरले थेट रिंगणात; तिकिटवाटपापूर्वीच उमेदवारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:00 IST

दोन दिवस उरले तरी युती-आघाड्या अनिश्चित

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष विचारमंथनात असताना इच्छुकांनी मात्र आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच इच्छुकांनी आपापल्या पक्षांच्या चिन्हांसह मिरवणुका काढायला सुरुवात केली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंतचा दोनच दिवसांचा कालावधी उरला आहे. राजकीय पक्षांच्या स्तरावर अद्याप मुलाखती आणि आढावा बैठकाच सुरू आहेत. तब्बल पावणेनऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाचे निर्णय होण्यापूर्वीच उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.सोमवारी मिरज, खानापूरसह काही तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. इच्छुकांनी गावातूनच मिरवणुका काढत शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे आपण निवडणूक लढवू इच्छित असलेल्या पक्षाच्या चिन्हासह मिरवणुका काढल्या. खानापूर तालुक्यातून पहिला अर्ज दाखल झाला.निवडणुका लांबल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे. या भाऊगर्दीत अगोदरच चिन्हासह मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करण्यातून पक्षाच्या उमेदवारीची दावेदारी भक्कम करण्याचा इच्छुकांचा प्रयत्न दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून हे इच्छुक तयारी करत होते, पण निवडणूक अपेक्षेपेक्षा सतत लांबत गेल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फिरत राहिले.आता प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्याने त्यांचा उत्साह अनावर आहे. त्यामुळेच काँग्रेस, भाजपसह राष्ट्रवादीच्या मुलाखती व कार्यकर्ता मेळाव्यांना मोठी गर्दी होत आहे. सांगलीत रविवारी काँग्रेसच्या बैठकीला मिरज तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. भाजपच्या दोन दिवसांच्या मुलाखतींसाठी सुमारे ९०० इच्छुक हजर होते.

पहिल्या टप्प्यात अर्जच नाहीतउमेदवारी अर्ज दाखल करण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली, पण सोमवारपर्यंत अत्यल्प अर्ज दाखल झाले. नेलेल्या अर्जांची संख्या मात्र हजारावर होती. पक्षांची अधिकृत उमेदवारी, युती-आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? याविषयी अनिश्चितता असल्याने इच्छुकांनीही ‘ठंडा करके खाओ’ अशी भूमिका घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: Aspirants jump into fray before party decisions.

Web Summary : Sangli ZP election witnesses aspirants filing nominations early, showcasing strength with processions before official party announcements. Uncertainty prevails amidst candidate enthusiasm.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Politicsराजकारण