शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाया खोदताना शेजारची भिंत कोसळून मजूर ठार, सांगलीतील गव्हाण येथे घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:17 IST

घराची भिंत कोसळून तीन मजूर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले.

गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथे नवीन घरासाठी पाया खोदत असताना बाजूच्या घराची भिंत कोसळून नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन मजूर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. नंदकुमार ऊर्फ नंदू आबा लोखंडे (वय ५०) यांचा तासगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. अन्य दोघा जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गव्हाण येथील वज्रचौंडे रस्त्यालगत शेरीमळा भागात गट नंबर ७५ मध्ये पांडुरंग भगवान जाधव यांची जागा आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी पाया खाेदण्याचे काम सुरु होते. या जागेच्या बाजूलाच अशोक रामचंद्र जाधव व बालक रामचंद्र जाधव यांचे दगडमातीच्या भिंती असलेले घर आहे. नंदकुमार ऊर्फ नंदू आबा लोखंडे, पिंटू अशोक सकट (वय ३८), मायाप्पा राजाराम ढाले (वय ३२) यांच्यासह काही मजूर येथे पायासाठी जमीन खोदत होते. काम सुरु असताना अशोक जाधव व बालक जाधव यांच्या घराची भिंत अचानक कोसळली. नंदू लोखंडे, पिंटू सकट, मायाप्पा ढाले हे तिघेही दगड-विटांच्या ढिगाऱ्याखाली सापडले. जाधव यांनी तत्काळ त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने ढिगाऱ्यातून बाहेर काढले. गंभीर जखमी असलेल्या नंदू लोखंडे यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयीन सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. अन्य जखमी पिंटू सकट व मायाप्पा ढाले यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास हवालदार भारत माने करीत आहेत.तहसीलदारांची भेटघटनास्थळी तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्तरीय प्रशासनास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू