कोरोनाच्या काळात विरोधक कोठे होते - अतुल भाेसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:22+5:302021-03-24T04:24:22+5:30
शिरटे (ता.वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अतुल भाेसले यांच्या उपस्थितीत सहकार पॅनेलमध्ये प्रवेश केला. यावेळी जितेंद्र पाटील, एल.आर.पाटील, ...

कोरोनाच्या काळात विरोधक कोठे होते - अतुल भाेसले
शिरटे (ता.वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अतुल भाेसले यांच्या उपस्थितीत सहकार पॅनेलमध्ये प्रवेश केला. यावेळी जितेंद्र पाटील, एल.आर.पाटील, दिलीपराव देसाई उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : आपलं झाकायचं आणि दुसऱ्यावरती टीका करायची, या नीतीचा वापर करून सभासदांची दिशाभुल करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. ट्रस्टवर टीका करणाऱ्यांनी कोरोनाच्या काळात आपण कोठे होते, याचे उत्तर सभासदांना द्यावे, असे आवाहन कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भाेसले यांनी विरोधकांना केले.
शिरटे (ता.वाळवा) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांशी संवाद साधतेवेळी ते बोलत होते. बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देसाई अध्यक्षस्थानी होते. यावेळी कृष्णाचे माजी संचालक एल. आर. पाटील, विद्यमान संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, अमोल गुरव, मनोजकुमार पाटील, विश्वजीत पाटील, माणिक पाटील, कैलास पाटील, नारायण शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे सदस्य शंभुराजे ऊर्फ विशाल पवार, वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रशांत रणदिवे, उद्योजक अनिल पाटील, दत्तात्रय सावंत, अमर देसाई यांनी सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला.
बाजार समितीचे संचालक दिलीपराव देसाई, वारणा व्हॅलीचे उपाध्यक्ष जगन्नाथ रणदिवे, कृष्णा बँकेचे संचालक रणजित लाड, परशराम देसाई, पंढरीनाथ पाटील, सचिन लाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद पाटील यांनी स्वागत केले. प्रा.मिलिंद देसाई यांनी आभार मानले.
यावेळी अरुण देसाई, संजय देसाई, प्रकाश देसाई, राजेंद्र लाड, शिवाजी रणदिवे, सागर शिंदे, ज्ञानदेव तांदळे, जयवंत पाटील, विलास पाटील, जालींदर देसाई, दिगंबर देसाई, शारदा पाटील, जयश्री पवार, छायाताई डिसले, रेखा तावरे, सुजाता नरळे उपस्थित होत्या.