शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

लोकमत जागर: सांगली महापालिका, जिल्हा परिषदेच्या शिलकी अंदाजपत्रकात लोकसहभाग कुठेय ?

By हणमंत पाटील | Updated: March 11, 2024 13:11 IST

दोन्ही प्रशासकांनी त्यांच्या अनुभवी प्रशासकीय टीमच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण योजना मांडण्याचा वेगळा प्रयत्न केला

हणमंत पाटीलसांगली : सांगली- मिरज व कुपवाड महापालिकेने व जिल्हा परिषदेच्या प्रशासकांनी शिलकी अंदाजपत्रक नुकतेच मांडले. प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर विविध योजनांसह वास्तवदर्शी अंदाजपत्रक मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही अंदाजपत्रकात लोकसहभाग हरवलेला दिसतोय. 

गेल्या आठवड्यात सांगली- मिरज व कुपवाड महापालिकेने व दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेने शिलकी अंदाजपत्रक मांडले. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सुमारे ८२३ कोटींचे कोणतीही करवाढ नसलेले वास्तवदर्शी अंदाजपत्रक मांडले, ही जमेची बाजू आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गतवर्षापेक्षा १६ कोटी कमी करून ५० कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मांडले. दोन्ही प्रशासकांनी त्यांच्या अनुभवी प्रशासकीय टीमच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण योजना मांडण्याचा वेगळा प्रयत्न केलेला दिसतो. महापालिकेच्या अंदाजपत्रकात शहरात नव्या ५० ई - बस, धुळगाव योजना, ड्रोनद्वारे घरपट्टी मूल्यांकन, मॉडेल स्मार्ट स्कूल, प्रशासकीय सुधारणा, खेळाडू दत्तक योजना, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशा काही वेगळ्या योजनासाठी विशेष तरतूद केलेली दिसतेय. परंतु, शहरातील शुद्ध पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना दिसत नाहीत. ड्रेनेजच्या रखडलेली योजना कधी पूर्ण होणार, झोपडपट्टी व वसाहतीतील नागरिकांच्या घराच्या प्रश्नांचे काय, स्मार्ट स्कूल करताना केवळ भिंती रंगवून उपयोग नाही, तर शिक्षकांना स्मार्ट होण्यासाठी प्रशिक्षण द्यावे लागेल. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिष्यवृत्तीसारख्या प्रोत्साहन योजनांसाठी आर्थिक तरतूद गरजेची आहे. शहरातील व्यापारी पेठातील छोटे व्यावसायिक व हातगाडी चालकांवर केवळ अतिक्रमण कारवाई करून उपयोग नाही. त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन ठोस व कायमस्वरूपी उपाययोजनाची गरज आहे.जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात आरोग्य केंद्र बिलमुक्त करणे, स्त्री परिचर यांना १० लाखांचा अपघात विमा, सोलर पॅनेल योजना, मागासर्गीयांना घरकुल, मुलींना सायकल, शाळा दुरुस्ती, मुली व महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण, तसेच काही शेतकरी योजनांसाठी ठोस तरतूद दिसतेय. पण जिल्ह्यातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, पाणलोट क्षेत्र विकासासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव दिसतो. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची केवळ दुरुस्ती करून चालणार नाही, तर शिक्षकांना काळाप्रमाणे स्मार्ट होण्यासाठी प्रशिक्षण व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन योजनांची आवश्यकता आहे. 

अंदाजपत्रकात लोकसहभाग का हवा ? महापालिका व जिल्हा परिषद या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन्ही प्रशासकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विविध भागात क्षेत्रीय सभा घेऊन नागरिकांचा अंदाजपत्रकात सहभाग घेणं गरजेचे होते. त्यामुळे नागरिकांनाना नेमके काय हवे, याचा अंदाज घेऊन आणखी परिपूर्ण अंदाजपत्रक करता आले असते. नागरिकांप्रमाणेच येथे रोजगार निर्माण करणारे व सर्वाधिक कर देणारे छोटे- मोठे उद्योजक व व्यावसायिक यांना अंदाजपत्रक सदर करण्यापूर्वी सहभागी करून घ्यायला पाहिजे. शहरात नवीन उद्योग व गुंतवणूक वाढण्यासाठी दोन्ही प्रशासकांनी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत लोकसहभाग महत्त्वाचा आहे. 

अंदाजपत्रकातील जमेची बाजू..फुगवटा नसलेले शिलकी व वास्तवदर्शी २) रखडलेल्या योजना पूर्णत्वासाठी तरतूद ३) कर्मचारी व सेवकांसाठी काही योजना ४) आरोग्य व शिक्षणाच्या तरतुदीला प्राधान्य ५) नागरिकांवर कोणतीही करवाढ नाही ६) रस्ते व ड्रेनेजच्या कामाला प्रारंभ 

या तरतुदींचा दिसतो अभाव..शुद्ध पाणी व टंचाईवर ठोस उपाययोजना २) शिक्षणासाठी १० टक्केपेक्षा कमी तरतूद ३) क्षेत्रीय सभेद्वारे लोकसहभागाचा अभाव ४) वाहतूक नियोजन, अतिक्रमणावर ठोस उपाय ५) उद्योग व व्यवसायिकांचे प्रश्न सोडविणे ६) शहर व जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी योजना 

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद