गोटखिंडीला तलाठी कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:43+5:302021-09-17T04:31:43+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा चावडीला तलाठीच नाही. शेतकऱ्यांना हेलपाटे मारून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर ...

गोटखिंडीला तलाठी कधी मिळणार?
गोटखिंडी : गोटखिंडी, ता. वाळवा चावडीला तलाठीच नाही. शेतकऱ्यांना हेलपाटे मारून तोंडाला फेस यायची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शेतकऱ्यांना विविध कामासाठी दाखल्यांची गरज असते. सातबारावरील चुकांची दुरुस्तीसाठी तलाठी कार्यालयात गेले असता तलाठीच नसतात. यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत. नूतन प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी लक्ष घालून ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गत दोन वर्षांत बोगस सातबारा उताऱ्याव्दारे सोसायटी माध्यमातून लाखो रुपये उचलून गैरव्यवहार केला होता. जमीन नसताना काहींनी कर्जमाफीचा लाभ घेतल्याचे उघड झालेने शेतकऱ्याला कर्ज घेण्यासाठी सात-बारा उतारे, दाखले असल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रथम तलाठी कार्यालयात धाव घेऊन तेथील सात-बारा उतारे, दाखले तलाठीच उपलब्ध नसल्यामुळे मिळत नाहीत. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली आहे. तरीही तलाठ्यांची नेमणूक अद्याप झालेली नाही.