शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दंड महापालिकेला करून भुर्दंड जनतेला का?

By अविनाश कोळी | Updated: February 21, 2024 19:21 IST

पृथ्वीराज पवार : हरित न्यायालयात दाद मागणार

सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणाला प्रशासकीय यंत्रणा, एमआयडीसी तसेच काही साखर कारखाने, उद्योग कारणीभूत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या माध्यमातून सामान्य जनतेला दंड ठोठावला आहे. हे पैसे प्रदूषण नियंत्रण अधिकारी, महापालिकेचे अधिकारी तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांकडून वसूल करायला हवेत, असे मत भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते म्हणाले की, नागरिकांना या दंडाच्या माध्यमातून भुर्दंड बसू नये म्हणून आम्ही प्रसंगी हरित न्यायालयात दाद मागू. कृष्णा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच यंत्रणा अत्यंत क्रूरपणे पाहत आहेत. कुपवाड व मिरज एमआयडीसीमध्ये उद्योगांचा संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी ना उद्योजक घेताहेत, ना एमआडीसी प्रशासन. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याबाबत हात वर केले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून पुढे नदीत मिसळत आहे.नागरिकांच्या सांडपाण्यापेक्षा साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर व त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार शासकीय यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी.महापालिकेचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच एमआयडीसी प्रशासन यास जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची वसुली केली जावी, अशी मागणी आम्ही याचिकेतून करणार आहोत.

कृष्णेची साथ सोडणे ही शाेकांतिकाकृष्णा नदीकाठी आपण राहात असतानाही प्रदूषणाची समस्या सोडून आपण वारणा नदी किंवा धरणातून पाणी आणण्यासाठी सरसावलो आहोत. आपल्या नदीची साथ सोडणे ही शोकांतिका आहे, असे पवार म्हणाले.

प्रतिसंगमावरून आंदोलनकृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी. तरतूद झाली नाही, तर प्रीतीसंगमापासून मंत्रालयापर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषण