पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:38+5:302021-09-06T04:29:38+5:30
फोटो दुपटेकडून लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत, तरीही ...

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागतात तेव्हा...
फोटो दुपटेकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत, तरीही शहरातील विविध रस्त्यांवर शाळकरी वयाची मुले भीक मागताना दिसतात. गेल्या दीड वर्षांत शाळा बंद असल्याच्या काळात तर भिकारी मुलांच्या संख्येत वाढ झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर मुख्य चौकांत भीक मागणाऱ्यांची वाढती संख्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब बनली आहे. ही सर्व मुले परराज्यातून येत असल्याचेही निरीक्षण आहे. शालाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात सरकारी कर्मचाऱ्यांना ही मुले सापडत नाहीत, हेच विशेष.
बॉक्स
पुष्कराज चौक
पुष्कराज चौकात सिग्नलवर सकाळपासूनच भीक मागणारी मुले दिसतात. वाहने थांबताच, त्यांचा गराडा पडतो. काही मुले सटरफटर वस्तुंची विक्री करत असली, तरी सर्रास मुले भीक मागणारीच असतात. सिग्नल बदलेल, त्यानुसार चौकात पळताना दिसतात.
रेल्वे पूल, मिरज रस्ता
मिरज रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ मारुती मंदिर परिसरातही मोठ्या संख्येने मुले भीक मागत असतात. शेजारीच उघड्या माळावर पालांमध्ये त्यांची वस्ती आहे. आई-वडिलांच्या माघारी ही मुले दिवसभर मिरज-सांगली रस्त्यावर वाहनांच्या मागे धावत पैसे मागतात.
कोट
बालहक्क कोण मिळवून देणार?
सांगली-मिरजेत भीक मागणारी बहुतांश मुले कर्नाटकातून पालकांसोबत आली आहेत. भीक मागून पैसे मिळविण्यासाठी आई-वडीलच रस्त्यावर पाठवितात. त्यांच्या पुनर्वसनाची किंवा मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी बालकल्याण विभागाची आहे. या समितीच्या बैठकाही नियमित होत नाहीत. अधिकारीवर्ग फक्त कागद रंगवितो. प्रत्यक्षात रस्त्यावर काम करत नाही.
- शिवाजी त्रिमुखे, बालहक्क कार्यकर्ता, सांगली.