शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

तलावाच्या जमिनीची भरपाई कधी?

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

तिकोंडीतील शेतकऱ्यांचा सवाल : नुकसान, पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील तलावासाठी संपादन केलेल्या जमिनीची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्वसाहत करुन मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर रेबगोंड, राजू पुजारी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे केली आहे.बागायत आणि जिरायत क्षेत्र याप्रमाणे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता दाखविण्याचा हक्क अधिनियम २०१३ च्या ३० अन्वये व प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ व २००१ या महाराष्ट्र अधिनियम क्र. ११ अन्वये जिल्हाधिकारी यांनी १८९९ चारमध्ये नमूद केलेले कोणतेही असल्यास बाजारमूल्य या कलमामध्ये जमिनीचे बाजारमूल्य निर्धारित करताना विचार करावयाचे निकष व घटक यासंबंधात तरतूद आहे. नुकसानभरपाईची रक्कम निर्धारित करण्याबाबत कलम २८ अन्वये तरतूद आहे. या कलमामध्ये सोलॅटियमच्या निवडीबाबत तरतूद आहे. सोलॅटियमची रक्कम ही नुकसान भरपाईच्या रकमेच्या १०० टक्के इतकी असेल, तसेच निवडीची किंवा ताबा घेण्याची तारीख यापैकी जी अधिक असेल, त्या तारखेपर्यंत जिल्हाधिकारी बाजार मूल्यांवर वार्षिक १२ टक्के दराने गणना केलेल्या रकमेच्या निवडी देईल, अशीदेखील तरतूद या कलमामध्ये आहे. परंतु भू-संपादन करताना बाजारमूल्य निर्धारित केलेले नाही. कमी मूल्य धरण्यात आले आहे. बाग, घर, विहीर, जमीन, कूपनलिकाचे मूल्यांकन कमी दराने केले आहे. केंद्राच्या भू-संपादन कराराप्रमाणे मिळावे. जमिनीची मोबदल रक्कम व ज्यांची घरे गेली आहेत, त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत विशेष भूमिसंपादन अधिकारी नं. १ मिरज यांना दिली आहे. निवेदनावर मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यांच्यासह ९३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)एकरी केवळ साठ हजारांची भरपाईतिकोंडी येथील नवीन साठवण तलावासाठी पाच वर्षांपूर्वी जमीन संपादन करण्यात आली आहे. तलावात गेलेली जमीन, घरे, विहिरी, कूपनलिका, फळबागांचे सर्वेक्षण होऊनसुध्दा नुकसानभरपाई मिळालेली नाही. तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर जमीन पाच वर्षापूर्वी भूसंपादन करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविण्यात आला असून, एकरी ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांनी रक्कम स्वीकारली नाही.