शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:30 AM

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत ...

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आता पूर ओसरतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी सांगलीत केली.विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपकबाबा शिंदे, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव सांळुखे, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील उपस्थित होते.मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले, सांगलीकरांचे लातूरकरांवर प्रेम आहे. दुष्काळी स्थितीत सांगलीकरांनी रेल्वेने लातूरला पाणी दिले होते. किल्लारी भूंकपावेळीही मदतीचा हात दिला होता. सांगलीकरांचे हे उपकार लातूरकर विसरणार नाहीत. सांगली जिल्हा महापुरातून सावरत असताना त्यांना उभे करण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेतला आहे. महापुरातही लातूरकरांनी मदत केली आहे. स्मकरंद देशपांडे म्हणाले, जिल्ह्यातील १०३ गावांत पूरस्थिती होती. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पुरात काम केले. एकीकडे पूरग्रस्त लोकांसाठी काम करताना दुसरीकडे दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेसाठीही काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा जिंकण्याच्यादृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विधानसभा संघनिहाय भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.प्रारंभी जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. रवींद्र आरळी, सागर खोत, सुरेश आवटी, डी. के. पाटील उपस्थित होते.पद्माळे गाव लातूरकरांकडून दत्तकपूरग्रस्त पद्माळे हे गाव लातूरकरांनी दत्तक घेतल्याची घोषणा मंत्री पाटील- निलंगेकर यांनी केली. या गावालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. लातूरचे जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या संपर्कात आहेत. लातूरमधील एका तहसीलदाराची खास नेमणूक करण्यात आली आहे. तेही आठवडाभर गावात थांबून ग्रामस्थांना मदत करीत आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. पुढील दोन वर्षात पद्माळे हे आदर्श गाव करण्याचा लातूरकरांचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विधानसभानिहाय प्रभारी व संयोजकांची नावे जाहीर केली. मिरजेसाठी प्रभारी प्रकाश बिरजे, तर संयोजक मोहन व्हनखंडे, सांगलीसाठी दीपक शिंदे, शरद नलवडे, इस्लामपूसाठी सुखदेव पाटील, यदुराज थोरात, पलूस-कडेगावला दत्तात्रय सूर्यवंशी, आप्पासाहेब काळेबाग, जतला परशुराम नागरगोजे, संजय गावडे, तासगाव-कवठेमहांकाळसाठी अरविंद तांबवेकर, हायूम सावनूरकर, तर शिराळ्यासाठी विजय चोपडे व प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.