स्वत:च्या संस्था बंद पाडणारे ‘कृष्णा’ काय सांभाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:38+5:302021-06-23T04:18:38+5:30

नेलेॅ : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटले असून एकाने एकही संस्था न काढता कारखाना कसा चालवू नये हे ...

What will 'Krishna', who shuts down his own organization, handle? | स्वत:च्या संस्था बंद पाडणारे ‘कृष्णा’ काय सांभाळणार?

स्वत:च्या संस्था बंद पाडणारे ‘कृष्णा’ काय सांभाळणार?

नेलेॅ : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक एकवटले असून एकाने एकही संस्था न काढता कारखाना कसा चालवू नये हे दाखवून दिले तर दुसऱ्याने स्वत: काढलेल्या संस्था कशा बंद पाडाव्यात हे दाखवून देले. स्वतःचा दवाखानाही न चालवता येणारे कृष्णा कारखाना काय सांभाळणार? असा खडा सवाल कृष्णाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केला.

नेलेॅ (ता. वाळवा) येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक दिलीप पाटील व बिरोबा मंदिर येथे सभासदांची बैठक झाली. यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, नेलेॅ हे गाव दिशा देणारे मार्ग दाखवणारे विचारी गाव आहे. अविचाराला येथे थारा नाही. सहकारी साखर कारखानदारीत स्थिरता लागते तरच ती प्रगतिपथावर जाते. ही स्थिरता फक्त सहकार पॅनल देऊ शकते. वडिलांच्या नावे असणाऱ्या पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ४८ कोटींच्या ठेवी संस्थापक म्हणून जबाबदारी घेऊन परत देणार आहात काय, कारखान्याची वाट लावणारेच कारखाना लढवायला निघालेत, परंतु सभासद मात्र या दोघांनाही कायमस्वरूपी घरी बसवणार आहेत.

डॉ. एस. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. संचालक दिलीप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कृष्णाचे माजी संचालक सर्जेराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयसिंग पाटील यांनी आभार मानले.

यावेळी आनंदराव मोहिते, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, सरपंच छाया रोकडे, हेमंत पाटील, वसंतराव कदम, दिनकर गडाळे, सुरेश पाटील, विजय पाटील उपस्थित हाेते. बिरोबा मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात माजी सरपंच व उमेदवार संभाजी पाटील, इंदुमती जाखले, जयकर कदम, महेश पाटील दादा ताटे, शामराव गावडे, भानुदास विरकर, सुनील पाटील,शिवाजी गावडे,सरगम मुल्ला आदी उपस्थित होते.

फोटो : २२ नेर्ले १

ओळ : नेलेॅ (ता. वाळवा) येथे सुरेश भाेसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजय पाटील, दिलीप पाटील, सरपंच छायाताई रोकडे आदी उपस्थित हाेते.

Web Title: What will 'Krishna', who shuts down his own organization, handle?