शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

शेतकरी जीव घ्यायला लागला तर काय होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनानेच निर्माण केलेल्या प्रतिकूल व्यवस्थेमुळे देशातील शेतकरी संकटात आहे. परिस्थितीपुढे हताश होऊन तो स्वत:चा जीव देत आहे. जेव्हा तो जीव घ्यायला सुरुवात करेल, तेव्हा काय अवस्था होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील चर्चासत्रात दिला.सांगली जिल्हा सुधार ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनानेच निर्माण केलेल्या प्रतिकूल व्यवस्थेमुळे देशातील शेतकरी संकटात आहे. परिस्थितीपुढे हताश होऊन तो स्वत:चा जीव देत आहे. जेव्हा तो जीव घ्यायला सुरुवात करेल, तेव्हा काय अवस्था होईल, याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील चर्चासत्रात दिला.सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत ‘शेतकºयांना कर्जमाफी हवी की नको?’ या विषयावर चर्चासत्र पार पडले, यावेळी ते बोलत होते.शेट्टी म्हणाले की, शासनाने एक तर शेतकºयाला बाजारपेठेत मुक्त सोडावे किंवा निर्बंध लादायचे असतील तर त्याच्या अडचणींची जबाबदारी स्वीकारावी. बाजारपेठेत वावरण्यास शेतकºयाला मुक्त केले, तर तो या स्पर्धेला तोंड द्यायला सक्षम आहे. निर्बंध घालून एकप्रकारे शेतकºयाचे पाय मोडण्याचे काम सरकार करते आणि अपंगत्वाची जबाबदारीही स्वीकारत नाही. त्यामुळेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या शेतीत १0 टक्क्यांपासून ४0 टक्क्यांपर्यंत शेतकरी प्रत्येक प्रकारच्या शेतीमध्ये तोटा स्वीकारतो. एकदा शेतकºयांचा सात-बारा कोरा करा आणि नंतर त्यांच्या अडचणींवर शाश्वत उपाय करावेत. एकदा असे उपाय केल्यानंतर शासनाने कोणतीही मदत शेतकºयांना करू नये.शासनाने ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. ९0 लाख शेतकºयांना कर्जमाफी मिळेल आणि ४0 लाख शेतकºयांचा सात-बारा कोरा होईल असे सांगितले. प्रत्यक्षात ५६ लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज दाखल झाले आहेत. निकषामध्ये यातील अनेकजण अपात्र ठरविले जातील. त्यामुळे शासनाची कर्जमाफी सात हजार कोटीपर्यंतच जाईल. सरकार केवळ खेळ करत आहे. ६६ कॉलमचे माहितीपत्रक भरून घेतले आहे, तो काय चोर आहे का? शेतकºयांना बोगस ठरवू नका, तो स्वाभिमानी आहे. मुळात एकाच कुटुंबातील अनेक अर्ज दाखल झाले, तर महिलेचा अर्ज प्रमुख म्हणून गृहीत धरला जातो. यामागे कोणताही उदात्त हेतू नसून, यातून सरकारला कर्जमाफीचा खर्च कमी करायचा आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयातून स्वत:चा आर्थिक भार कमी करू पाहणाºया शासनाच्या मनात शेतकºयांबद्दल कोणतीही कणव नाही, असे ते म्हणाले.यावेळी अ‍ॅड. के. डी. शिंदे, अ‍ॅड. अमित शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, रवींद्र चव्हाण, गुलाम हुसैन बुजरूक, हर्षवर्धन आलासे, महालिंग हेगडे, अरूणा शिंदे, सचिन चोपडे, रवींद्र काळोखे, तानाजी रूईकर, सुनील गिड्डे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.बळीचा बकराराज्यकर्ती जमात ही ढोंगी आहे. प्रत्येकालाच लाच देण्याची पद्धत इथे रुजली आहे. देवसुद्धा यातून सुटले नाहीत. देवासाठी बकºयाचा बळी दिला जातो. बळी देताना दुबळ्या प्राण्याला निवडले जाते. तसेच आता अन्य घटकांना खूश करण्यासाठी नेहमीच दुबळ्या वाटणाºया शेतकºयांना निवडले जात आहे, असेही शेट्टी म्हणाले.गावात आणि भावात!अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले की, आमच्या गावात आणि आमच्या भावात शेतमालाची विक्री हवी. जगातील कोणताही व्यवसाय दर न ठरता होत नाही. पण शेतकरी प्रथम शेतीमाल दुसºयाच्या ताब्यात देतो आणि नंतर पैसे घेतो. ही व्यवस्थाच अन्यायी आहे.