शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन काय कामाचे, रिल्स, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 12:09 IST

अतिउत्साह जिवावर बेतण्याची भीती

नितीन नलवडेसांगली : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, अनेकजण वर्षापर्यटनासाठी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जात असतात; परंतु अतिउत्साहामुळे काही वेळा आपला जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. पुण्याजवळील लोणावळा येथील घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या एका घटनेत राधानगरीत पर्यटनासाठी गेलेले निपाणीतील दाेन युवक दुधगंगा नदीत बुडाले.सध्या रिल्सचा जमाना असून, या रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजचे तरुण-तरुणी कोणत्याही थराला जात आहेत. रिल्सच्या नादाला लागून अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. सध्या पावसाला नुकताच सुरू झाला आहे. निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे. पर्यटनासाठी अनेक जण बाहेर पडत आहेत. उंचच उंच डोंगरावरून खाली पडणारा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. यावेळी धबधब्याच्या ठिकाणी जाताना प्रवाहात वाहून जाण्याची मोठी शक्यता असते. यावेळी कुटुंबासोबत जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच सुटीच्या दिवशी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक जण आंबोली, कॅसलरारॅक, ठाेसेघर, गोकाक, राऊतवाडी, वजराई, नवजा आंबा घाटात आवर्जून जात असतात; परंतु अशा ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात, तसेच धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने घसरून पडण्याची शकयता असते, तसेच सेल्फीसाठी अनेक जण जीव धोक्यात घालतात, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, अशातच अजाणतेपणे लाखमोलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी निसर्गाचा आनंद लुटताना भान ठेवणे गरजेचे आहे.

रिल्स, सेल्फीसाठी वाटेल तेसध्या तरुणाईमध्ये रिल्सची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये अनेक तरुण, तरुणी आपला जीव धोक्यात घालून डोंगराच्या, तसेच दरीच्या टोकावर उभे राहून सेल्फी घेत असतात. यामध्ये ते आपल्या जिवाची पर्वा करत नाहीत, आणि लाखमोलाचा जीवच गमावून बसतात. वेगवेळे चॅलेंज स्वीकारण्याच्या नादात धबधब्याच्या मोठ्या प्रवाहात जाऊन अतिधाडस करतात; परंतु हेच धाडस जिवावर बेतू शकते.

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटनRainपाऊस