आरेवाडीत स्वराज्य ध्वजाचे मोठ्या उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:23+5:302021-09-25T04:28:23+5:30
ओळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक ...

आरेवाडीत स्वराज्य ध्वजाचे मोठ्या उत्साहात स्वागत
ओळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन जगन्नाथ कोळेकर, आबासाहेब साबळे यांच्याहस्ते करण्यात आले.
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा बनात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन व स्वागत गजनृत्य व ढोलाच्या निनादात करण्यात आले.
सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांच्या हस्ते पूजन व्हावे, अशी भावना अनेकांची होती. जनसामान्यांच्या भावनांचा आदर करत स्वराज्य ध्वज गौरव समितीने महाराष्ट्रासह देशातील विविध स्फूर्तिस्थळांच्या ठिकाणी ध्वजाचे प्रातिनिधिक पूजन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार शुक्रवारी आरेवाडी येथील बिरोबा बनात ध्वजाचे पूजन करण्यात आले. १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर कर्जत-जामखेडमधील खर्डा येथे भारतातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभा करण्यात येणार आहे. त्याचे पूजन आरेवाडी येथील बिरोबा बनात करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, पोलीसपाटील रामचंद्र पाटील, सरपंच आबासाहेब साबळे, जत तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील, सागर शिनगारे, जयंत भोसले, अमोल माने, विजय फडतरे, जानवी भोसले, डाॅ. रूपाली शिनगारे, अरुण फडके, सचिन पांढरे, प्रवीण धडस, दत्ता बिराजदार, नाना गवळी, विष्णू यादव, संदीप शिंदे, पंकज लोखंडे, रामदास दुधाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.