शिराळा येथे भाजप विद्यार्थी आघाडीच्या संघर्ष यात्रेचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:19 IST2021-07-04T04:19:09+5:302021-07-04T04:19:09+5:30
ओळ : शिराळा येथे भाजप विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत जयसिंगराव शिंदे, प्रतापराव पाटील, नगरसेवक केदार नलवडे, नीलेश पाटील, योगेश ...

शिराळा येथे भाजप विद्यार्थी आघाडीच्या संघर्ष यात्रेचे स्वागत
ओळ : शिराळा येथे भाजप विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत जयसिंगराव शिंदे, प्रतापराव पाटील, नगरसेवक केदार नलवडे, नीलेश पाटील, योगेश पाटील, रामभाऊ जाधव यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील महाडिक युवा शक्तीच्या संपर्क कार्यालयात सांगली जिल्हा भाजप विद्यार्थी आघाडीतर्फे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयाेजित विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आले.
भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष याेगेश पाटील यांनी स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. सरकारने त्या मान्य केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष राज्य शासनाने थांबविला पाहिजे.
यावेळी प्रतापराव पाटील, नगरसेवक केदार नलवडे, प्रतीक साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रामभाऊ जाधव, हारुण शेख, सागर पाटील, महेश कोळे, सचिन दिवटे, अभिषेक हसबनीस, प्रतीक हसबनीस, सौरभ नलवडे, अभिनव नलवडे, वैभव इंगवले, भूषण पाटील, अजित कुंभार, बाळकृष्ण घाटगे, बाजीराव नलवडे, अशोक सवाईराम, अमित माने, प्रथमेश शेटे उपस्थित होते. रामभाऊ जाधव यांनी आभार मानले.
चाैकट
तालुका भाजपतर्फेही स्वागत
संघर्ष यात्रेचे शिराळा तालुका भाजपतर्फेही स्वागत करण्यात आलेे. माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, सम्राट शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. रणधीर नाईक म्हणाले, राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्याची गरज आहे. विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक साळुंखे यांनी स्वागत केले.