जत येथे दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:42+5:302021-02-20T05:17:42+5:30

शेगाव : शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद या ‘दीक्षाभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस’ रेल्वेचे जत तालुक्यातील एकमेव जतरोड (वाळेखिंडी) रेल्वे ...

Welcome to Deekshabhoomi Express at Jat | जत येथे दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे स्वागत

जत येथे दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे स्वागत

शेगाव : शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद या ‘दीक्षाभूमी साप्ताहिक एक्स्प्रेस’ रेल्वेचे जत तालुक्यातील एकमेव जतरोड (वाळेखिंडी) रेल्वे स्थानकावर शुक्रवारी स्वागत करण्यात आले. केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सोलापूर विभागाचे संचालक प्रकाश जमदाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

एक्स्प्रेस रेल्वेच्या नियोजनात जत रोड रेल्वे स्टेशन हा थांबा नव्हता. या थांब्यासाठी शामसुंदर मनधना, प्रकाश जमदाडे, माजी सरपंच एन. डी. शिंदे, नजीर नदाफ, किरण इतापे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले आहे. तसेच खासदार संजयकाका पाटील यांनीदेखील तालुक्यातील रेल्वेचे प्रश्न सुटण्यासाठी मदत केली आहे.

यावेळी एन. डी. शिंदे, भीमराव शिंदे, पंचायत समिती सदस्य शिवाजी शिंदे, भगवान काटकर, स्टेशन प्रबंधक विनय प्रसाद, प्रशांत विभूते, संभाजी शिंदे, श्रीकांत विसापुरे, उद्योजक महादेव हिंगमीरे, विजय पाटील, तानाजी शिंदे, सतीश शिंदे, दिगंबर शिंदे, आशिष शिंदे, राजेंद्र कदम, धनंजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Web Title: Welcome to Deekshabhoomi Express at Jat