शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
2
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
3
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
4
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
5
शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट?; वळसे पाटलांनी दिलेल्या उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
6
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
7
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
8
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
9
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
10
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
11
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
12
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
13
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
14
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
15
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
16
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
17
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
18
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
19
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
20
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

नातीच्या जन्माचे स्वागत सवाद्य गृहप्रवेश : फुलांच्या पायघड्या; फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:37 PM

वाळवा (जि. सांगली) : येथील प्रगतशील शेतकरी विजय मगदूम (वस्ताद) यांनी शनिवारी नातीच्या जन्माचे अनोखे स्वागत केले.

महेंद्र किणीकर ।वाळवा (जि. सांगली) : येथील प्रगतशील शेतकरी विजय मगदूम (वस्ताद) यांनी शनिवारी नातीच्या जन्माचे अनोखे स्वागत केले. नातीला जैन मंदिरापासून घरापर्यंत पूर्ण रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालून, प्रचंड फटाक्यांची आतषबाजी करीत नेण्यात आले. यावेळी महिलांनी हातात ‘माझी मुलगी, माझा अभिमान’, बेटी को जो दे पहचान, वही परिवार है महान’, ‘लेक लाडकी या घरची’ असे फलक घेतले होते, तर सजविलेल्या पाळण्यात घालून नातीचा सवाद्य गृहप्रवेश घडवण्यात आला.

येथील कोटभागमधील विजय मगदूम यांचे पुत्र आशिष व आदिती या दाम्पत्याला पाच महिन्यांपूर्वी मुलगी झाली. आदिती यांचे बाळंतपण त्यांच्या माहेरी झाले. त्या पाच महिन्यांनी शनिवारी सासरी आल्या. मुलीचे नाव ठेवण्यापासून ती घरी येईपर्यंत तिचे कोडकौतुक करण्यात आले. तिचे नाव सिद्धी ठेवण्यात आले. सिद्धी व तिची आई आदिती मुहूर्तानुसार बाळंतविड्यासह वाळव्यात आल्या. त्यांचे आगमन होताच विजय मगदूम यांनी नातीच्या स्वागतासाठी कोटभाग येथील जैन मंदिरापासून ते घरापर्यंत पूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या. सजविलेला पाळणा आणला. त्यात नातीला घालून महिलांची रॅली काढण्यात आली.

‘बेटी को अधिकार दो - बेटे जैसा प्यार दो’, ‘माझी मुलगी, माझा अभिमान’, ‘लेक लाडकी या घरची’ असे फलक हाती घेऊन महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी असलेल्या सांगली जिल्ह्यात विजय मगदूम यांनी नातीच्या जन्माचे अनोखे स्वागत करून आदर्श घालून दिला आहे. यावेळी उद्योगपती रघुनाथ पाटील, हुतात्मा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र तथा अशोक मगदूम, प्रकाश होरे, राजेंद्र पेशवे उपस्थित होते.वाळव्यातील प्रगतशील शेतकरी विजय मगदूम यांनी नातीच्या जन्माच्या स्वागतासाठी कोटभाग येथील जैन मंदिरापासून ते घरापर्यंत पूर्ण मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या व सजविलेल्या पाळण्यात नातीला घालून महिलांनी रॅली काढली.     .....भाग्यशाली नात सिद्धी.

टॅग्स :SangliसांगलीChildren Dayबाल दिन