वांगीत भरला आठवडी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:08+5:302021-04-02T04:28:08+5:30

वांगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही वांगी (ता. कडेगाव) येथे गुरुवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. अनेकांच्या ...

The week market filled with eggplant | वांगीत भरला आठवडी बाजार

वांगीत भरला आठवडी बाजार

वांगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही वांगी (ता. कडेगाव) येथे गुरुवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. अनेकांच्या तोंडाला मास्कही नव्हता. यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासन कोरोनाबाबत कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. यामुळे जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बाजारामुळे त्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. बाजारासाठी अनेकजण लांबून प्रवास करत इथे पोहोचत असता. एसटी किंवा अन्य वाहनांमध्ये त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा बाजार भरवू नये, असे शासनाने सांगितले होते.

मागील गुरुवारी चिचंणी-वांगी पोलिसांनी बाजार बंद करून काही विक्रेत्यांना दंडही केला होता. तरीही पुन्हा गुरुवारी गावातील व्यापाऱ्यांनी बाजार भरवला. याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीही दक्षता घेतली नाही.

Web Title: The week market filled with eggplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.