राजकारणाला समाजसेवेची जोड देऊन काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:03+5:302021-09-02T04:57:03+5:30

कवठेमहांकाळ येथील आर. आर. पाटील प्रतिष्ठान व सिनर्जी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित ...

We will work by adding social service to politics | राजकारणाला समाजसेवेची जोड देऊन काम करू

राजकारणाला समाजसेवेची जोड देऊन काम करू

कवठेमहांकाळ येथील आर. आर. पाटील प्रतिष्ठान व सिनर्जी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी रोहित पाटील बोलत होते.

रोहित पाटील म्हणाले, आर. आर. पाटील यांनी नेहमीच त्यांच्या राजकीय जीवनात गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. आपणही आर. आर. पाटील यांच्या विकासवाटेवरच वाटचाल करू व गोरगरीब, उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.

या शिबिरात दोन दिवसांत जवळजवळ पावणेपाचशेवर लोकांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले. यामध्ये नेत्ररोग, हाडांचे विकार, पोटाचे विकार, दातांचे विकार, हृदयरोग, कान, नाक, घसा आदी व्याधींच्या तपासण्या करून मोफत उपचार व औषधे देण्यात आली.

समारोपप्रसंगी शंतून सगरे, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष महेश पवार, महेश पाटील, मारुती लोहार, आकाश जाधव, सोनू डबीरे, शुभम जाधव, अजित सुतार, सर्फराज सावणुरकर यांच्यासह आर. आर. पाटील प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच सिनर्जी हॉस्पिटलचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: We will work by adding social service to politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.