माडगूळकरांच्या स्मारकासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:20+5:302021-04-19T04:24:20+5:30

सुशांत देवकर, आनंदराव पाटील, सदस्य सादिक खाटीक, दत्ता यमगर, राजेंद्र सावंत या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माडगुळेतील ...

We will pay homage to the Guardian Minister for the memorial of the conspirators | माडगूळकरांच्या स्मारकासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालू

माडगूळकरांच्या स्मारकासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालू

सुशांत देवकर, आनंदराव पाटील, सदस्य सादिक खाटीक, दत्ता यमगर, राजेंद्र सावंत या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माडगुळेतील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर, प्रा. डॉ. अंबादास माडगूळकर, कथाकार ॲड. नानासाहेब झोडगे, आदींच्या पदस्पर्शाने माडगुळे गाव पुनीत झाले आहे. येथील बामणाचा पत्रा, माडगूळकरांचे निवासस्थान संरक्षित करून माडगूळकर बंधूचे जागतिक दर्जाचे स्मारक निर्माण करणे, माडगुळे येथे येणाऱ्या देशभरातील साहित्यप्रेमी, माडगूळकर प्रेमींसाठी प्रशस्त शासकीय विश्रांतीगृह उभारणे, महाडिक वस्ती व लिंगडे वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि महाडिक वस्तीलगतच्या बुद्धिहाळ तलावाच्या कालव्यामधून नवा प्रवाही मार्ग काढणे, आदी प्रश्नांकडे पालकमंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी अनिल बाबर, प्रवीण बाबर, अमोल विभूते, नितीन लिंगडे, यशवंत खळगे, सुभाष विभूते, दामोदर लिंगडे, अतुल विभूते, किशोर विभूते, सागर लिंगडे, उमेश लिंगडे, आदी उपस्थित होते.

Web Title: We will pay homage to the Guardian Minister for the memorial of the conspirators