शिराळकरांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:13+5:302021-03-13T04:49:13+5:30
फोटो ओळ : शिराळा येथील प्रभाग क्रमांक ६ व १ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक महादेव गायकवाड यांच्या ...

शिराळकरांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध
फोटो ओळ : शिराळा येथील प्रभाग क्रमांक ६ व १ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक महादेव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सीमा कदम, उत्तम डांगे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी नगरसेवक म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नगरसेविका सीमा कदम यांनी दिली. येथील प्रभाग क्रमांक ६ व १ मधील ७ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक उत्तम डांगे, भाजपचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ कवठेकर उपस्थित होते.
सीमा कदम म्हणाल्या, शहरामध्ये नगरोत्थान योजनेंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत. काॅंक्रिटीकरण, मुरुमीकरण याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याचे काम आम्ही नगर पंचायतीच्या माध्यमातून प्राधान्याने करत आहोत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, रणधीर नाईक यांच्या सहकार्यातून शिराळा शहरामध्ये विविध विकासकामे करण्यामध्ये आम्ही सातत्य ठेवले आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक महादेव गायकवाड, विलास शिंदे, विनायक गायकवाड, संभाजी कदम, संदीप शिंदे, प्रदीप कदम, दादासो शिंदे, नारायण शिंदे, शिवाजी शिंदे, नथुराम कदम, सचिन नलवडे, अभिजीत शेणेकर, गणेश खबाले-पाटील उपस्थित होते.