लिंगनूर गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:39+5:302021-06-01T04:19:39+5:30
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, पोलीस पाटील मलय्या स्वामी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे, ग्रामसेवक सुरेश ...

लिंगनूर गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, पोलीस पाटील मलय्या स्वामी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे, ग्रामसेवक सुरेश पवार, तलाठी विजय जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. सायली डोंगरे, आरोग्य सेवक एम. एस. कोळी, कांचन शिंदे यांनी पुढाकार घेतला. गावाने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांनी प्रत्येक प्रभागानुसार पाच दिवसांतून एकदा सर्व्हे केला आहे. सर्व व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यामध्ये मोलाची कामगिरी झाली आहे, गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले.
चौकट
आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे योगदान
जीव धोक्यात घालून आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली आहे. आशा सेविका सरिता सूर्यवंशी, पद्मावती पुजारी, सविता बनसोडे, अनिता बनसोडे, संजीवनी शिंदे, अंगणवाडी सेविका निर्मला पाटील, सुनीता शेळके, विमल पाटील, काशीबाई सूर्यवंशी, सुवर्णा सोनुरे, शोभा मगदूम यांचे मोलाचे योगदान आहे.