मेणी. येळापुरातील राखीव वनक्षेत्रात उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:31+5:302021-01-20T04:27:31+5:30
शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य असून ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या जंगलातील बिबटे, गवे, रानडुकरे ...

मेणी. येळापुरातील राखीव वनक्षेत्रात उत्खनन
शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य असून ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या जंगलातील बिबटे, गवे, रानडुकरे यासारखे अनेक वन्यप्राणी येऊन शेतीचे नुकसान करत आहेत. नुकसान झालेल्या पिकांची भरपाईही मिळत नाही. त्यातच चांदोली अभयारण्याशेजारी असलेल्या परिसरात जंगल, जंगल शेजारील गावे आणि जंगलाच्या वीस किलोमीटर क्षेत्रातील गावे असे तीन प्रकारचे झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अभयारण्यापासून यामध्ये मेणी,येळापूर, शेडगेवाडी, नाठवडे यापर्यंतच्या गावांचा समावेश आहे.
सध्या पाचवड फाटा (कराड) ते कोकरूडपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, याच्या कामासाठी लागणारी माती, मुरुम, दगड हे राखीव वनक्षेत्र असलेल्या मेणी, कुंभवडेवाडी, येळापूर या गावाच्या कार्यक्षेत्र असलेल्या ठिकाणच्या डोंगर, पठार आणि माळरान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले आहे. मात्र वनविभागाच्या क्षेत्रात कुणालाही उत्खननास परवानगी नसताना या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने त्याला कोणत्या आधारे परवानगी मिळाली. सर्वसामान्य शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांस त्याची जनावरे चरायला गेली तरी कारवाई करणाऱ्या वनविभागास हे उत्खनन का दिसले नाही. याची चौकशी ची मागणी शेतकरी, ग्रामस्तांच्या वतीने करण्यात येत आहे.
या राखीव झोनमध्ये कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी विविध प्रकारची परवानगी घ्यावी लागते. असे असतानाही या ठेकेदाराने मोठ्या उत्खनन केले असून, सध्या रस्त्यासाठी लागणारा डांबर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून यांना परवानगी मिळालीच कशी अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
फाेटाे : १९ काेकरुड १.. २