चांदोली परिसरातील धबधबे कोसळू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:28+5:302021-06-30T04:17:28+5:30
चांदोली परिसरात सध्या धुवाधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली व परिसर हिरवागार झाला आहे. चांदोली ...

चांदोली परिसरातील धबधबे कोसळू लागले
चांदोली परिसरात सध्या धुवाधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली व परिसर हिरवागार झाला आहे. चांदोली धरणातील पाणीसाठा, सभोवतालचा हिरवाकंच परिसर यामुळे चांदोलीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक तुरळक प्रमाणात येत आहेत. लाॅकडाऊन नियमांचे पालन करत ते येत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व धरणावर प्रवेश नसल्यामुळे उखळू येथून अंबाईवाडाकडील सुमारे तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा व डोंगरकपारीतील छोटे-मोठे धबधबे लांबूनच पाहून सेल्फी काढण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. शिराळा तालुक्यातील जाधववाडीजवळील टायगर पाॅइंटवरून चांदोली धरणाचा नयनरम्य देखावा व सभोवतालचा निसर्गाचा नजराणा व छोटे-मोठे धबधबे पाहण्यास मिळत आहेत. पर्यटक हा आनंद लुटत आहेत.
फोटो-
चांदोली धरण परिसरातील उखळू (ता. शाहूवाडी) येथील पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा.