ताकारी वितरीका क्रमांक २चे पाणीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:36+5:302021-05-03T04:21:36+5:30
यावेळी अरुण लाड म्हणाले, या नऊ किलोमीटर लांबीच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी शासनाने ११ कोटी ८२ लाख रुपये भरघोस निधी देऊ ...

ताकारी वितरीका क्रमांक २चे पाणीपूजन
यावेळी अरुण लाड म्हणाले, या नऊ किलोमीटर लांबीच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी शासनाने ११ कोटी ८२ लाख रुपये भरघोस निधी देऊ केला आहे. या वितरिकेमुळे लाभक्षेत्रातील शेतीमध्ये सुबत्ता येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला होता. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर यांनीही वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आहे. या गावातील सर्व क्षेत्राला पूर्ण क्षमतेने माफक दरात पाणी मिळेल.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीकांत लाड, सचिव मुकुंद जोशी, वसंत लाड, चंदर नांगरे, कुंडलिक एडके, उपाध्यक्ष विजय लाड, प्रदीप लाड, उपअभियंता उमेश साळुंखे, कनिष्ठ अभियंता प्रकाश येसणे, वितरिका कॉन्ट्रॅक्टर विशाल देसाई, अमर लाड, दादा पाटील, अशोक पवार, दिनकर लाड, सुखदेव कनुंजे उपस्थित होते.
चौकट...
या वितरिकेसाठी राजकारणासाठी पाणी नाही तर शेतीसाठी प्राधान्याने पाणी देणे या उद्देशाने पाणी संघर्ष समितीने २०१७ पासून केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
- श्रीकांत लाड, अध्यक्ष पाणी संघर्ष समिती.
फाेटाे : ०२ पलुस १