शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'जलसंपदा, महापालिकेच्या निष्क्रियतेमुळेच सांगलीत पाणी टंचाई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 18:43 IST

प्रदूषण अधिकारी गप्प का ?

सांगली : कोयना धरणात सध्या ६७ टीएमसी पाणीसाठा असतानाही केवळ जलसंपदा आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे सांगली शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेबद्दल त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले की, पाणी नसल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. नदीचे सध्याचे पात्र हे केवळ महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीही समन्वय नसल्यामुळेच कोरडे पडले आहे. कोयना धरणात सध्या पाणीसाठा ६७ टीएमसी आहे. जवळपास ६१ टक्के पाणीसाठा आहे. वारणेमध्ये २६ टीएमसी पाणी आहे. असे असताना सांगलीकरांना मात्र आता आठ दिवस दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कऱ्हाड ते सांगलीपर्यंत गटारी, कारखाना मळी, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे दूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. हेच दूषित पाणी सांगलीकरांना प्यावे लागत आहे. यामुळे अनेक आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याला महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा फटका जनतेला बसत आहे. या सर्वांचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे.

कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या दूषित पाण्याबाबत तक्रार केली आहे. कृष्णा नदीतील पाण्याबाबत कोयना धरणातील अधिकाऱ्यांशी जलसंपदा आणि महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. यावेळी बैठकीला विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सतीश रांजणे, आदी उपस्थित होते.प्रदूषण अधिकारी गप्प का ?कृष्णा आणि वारणा नद्यांच्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना यापूर्वी कृष्णा नदीच्या दूषित पाणी आणि मृत माशाबद्दल जाब विचारला होता. तरीही त्यांच्याकडून दूषित पाण्यास जबाबदार कारखाने आणि महापालिकेवर कारवाई होत नाही, असा आरोपही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी