शिराळ्याच्या वाकाईवाडीत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:33+5:302021-04-25T04:26:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : वाकाईवाडी (ता. शिराळा) येथील बावीस वर्षांपासूनची नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. नवीन प्रस्ताव ...

शिराळ्याच्या वाकाईवाडीत पाणीटंचाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : वाकाईवाडी (ता. शिराळा) येथील बावीस वर्षांपासूनची नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे. नवीन प्रस्ताव कागदावरच आहेत. पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. त्यातच कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे.
वाकाईवाडीची लोकवस्ती कमी आहे. हाकेच्या अंतरावर वारणेचा डावा कालवा असूनही शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. नवीन प्रस्ताव दिले आहेत. लोकांना एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त्यातच कोरोना रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सोय न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
ग्रामसेवक सतीश जगताप यांनी दोन दिवसांत टँकरने पाणी देणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच प्रकाश चव्हाण, भास्कर रांजवण, सखाराम घोलप, मोहन शिराळकर, भगवान भाष्टे, आदी उपस्थित होते.
कोट
डोंगर कपारीत चार ठिकाणी पाण्याचे झरे आहे. येथून सायफन पद्धतीने पाणी देण्यासाठी स्थानिक विकास निधीतून साडेसात लाख रुपये मंजूर आहेत, तर ५२ लाखांची योजनाही मंजूर आहे. परंतु, कोरोनाने कामास सुरुवात नाही.
- सतीश जगताप, ग्रामसेवक, वाकाईवाडी.
कोट
सरपंच मुंबईला नोकरीस असल्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक कामासाठी उशीर होत असल्याने लोकांचे नुकसान होत आहे.
- भास्कर रांजवण, वाकाईवाडी.