पाणीपुरवठा सभापतींच्या प्रभागातच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST2021-07-19T04:17:56+5:302021-07-19T04:17:56+5:30

जत : जत शहरातील पाणी पुरवठा सभापतींच्या प्रभाग क्रमांक आठमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ...

Water scarcity only in the ward of water supply speakers | पाणीपुरवठा सभापतींच्या प्रभागातच पाणीटंचाई

पाणीपुरवठा सभापतींच्या प्रभागातच पाणीटंचाई

जत : जत शहरातील पाणी पुरवठा सभापतींच्या प्रभाग क्रमांक आठमध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असून, तातडीने या प्रभागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी केली आहे.

जत नगर परिषदेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक आठमधील साळे वस्ती, माता रमाई कॉलनी, दुधाळ वस्ती, कृषी कॉलनी, पावतका परिसर व आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्यावाचून गैरसोय होत आहे. अन्यवेळी व लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीमध्ये लोकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आलेली आहे.

प्रभाग क्रमांक आठमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशाठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय जत नगर परिषदेने करुन नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबवावा, अन्यथा बहुजन समाज पक्षाच्यावतीने जत नगर परिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

Web Title: Water scarcity only in the ward of water supply speakers