कवठेमहांकाळ तालुक्यात तलावांची पाणीपातळी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:26+5:302021-05-19T04:26:26+5:30
फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यातील नृसिंहगाव येथील तलावाच्या पाणीपातळीत घट होत आहे. महेश देसाई शिरढोण : गेल्या एक महिन्यापासून ...

कवठेमहांकाळ तालुक्यात तलावांची पाणीपातळी घटली
फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यातील नृसिंहगाव येथील तलावाच्या पाणीपातळीत घट होत आहे.
महेश देसाई
शिरढोण : गेल्या एक महिन्यापासून कवठेमहांकाळ तालुक्यातील अकरा तलावातील पाणीपातळी खालावली आहे. तर, छोटे-मोठे तलाव कोरडे पडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील सर्व तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी द्राक्ष बागेची छाटणी करत आहेत. पण आग्रणी नदीसह तालुक्यातील तलाव कोरोडे पडू लागले आहेत. यामुळे शेतीच्या पाण्याचा पश्न निर्माण झाला आहे. यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे केली होती. आ. पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना तालुक्यातील अकरा तलाव व अग्रणी नदीमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, अशा मागणीचे पत्र दिले होते. पण अद्याप पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन झाले नाही.
कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची देखील समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यातील सर्व तलाव व अग्रणी नदीत सोडावे, अशी मागणी होत आहे.
चौकट
तलावातील पाणीसाठा
कठेमहांकाळ तालुक्यातील कुची (९२.४१ द.ल.घ.मी), रायवाडी (६०.८१), लांडगेवाडी सध्या- शिलखाली, लंगरपेठ (२९.०६), नांगोळे (१०.४८), बोरगाव (८.२५), हारोली- शिलखाली, दुधेभावी (५४.३९), घोरपडी (३३.३९), बंडगरवाडी (२७.३६), बसप्पावाडीमध्ये (१६८.६२) असा साठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.