महाडिक समूहातर्फे पूरग्रस्तांना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:20+5:302021-07-28T04:27:20+5:30
कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा माेठा फटका पाणी पुरवठा योजनांना बसला आहे. अनेक गावाच्या पाणी योजना ...

महाडिक समूहातर्फे पूरग्रस्तांना पाणी
कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा माेठा फटका पाणी पुरवठा योजनांना बसला आहे. अनेक गावाच्या पाणी योजना बंद आहेत. लोकांची पाण्याची गरज ओळखून राहुल महाडिक यांनी १ लाख लीटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली.
राहुल महाडिक यांनी मिरज पश्चिम भागातील महापुराने नुकसान झालेल्या कसबे डिग्रज, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी आदी गावांची पाहणी केली. यावेळी विविध प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी गरज ओळखून तत्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. यावेळी सागर कोरूचे, बंडू कागवडे, संजय शिंदे, आर. एम. बागडी आदी उपस्थित होते.
270721\1623-img-20210727-wa0054.jpg
भा ज प नेते राहुल महाडिक यांनी पूरग्रस्त कसबे डिग्रजची पाहणी करून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली