शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात २४८ गावांतील पाणी दूषित, नेमकी गावं कोणती...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 19:03 IST

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. ...

सांगली : जिल्हा परिषद पाणीपुरवठा स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी शाळेसह गावांतील पाण्याचे पाच हजार २७६ नमुने घेतले होते. यापैकी २४८ गावांतील ३२७ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावातील शाळा, अंगणवाड्यांसह ग्रामपंचायतीला दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.आटपाडी तालुक्यातील करगणी, दिघंची, गोमेवाडी, शेटफळे, करगणीसह १३ गावांमधील १४ पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. जत तालुक्यातील संख, येळवी, माडग्याळ, उमदी, निगडी खुर्दसह १८ गावांमधील २० पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस, बस्साप्पावाडी, कोकळे, कुकटोळी, मोरगाव या पाच गावांतील पाच नमुने दूषित, तर मिरज तालुक्यातील मालगाव, एरंडोली, खंडेराजुरी, सलगरे, कसबेडिग्रज, विजयनगर, कवठेपिरान, कवलापूर, भोसे, बुधगाव आदी ३९ गावांतील ६८ नमुने दूषित आले आहेत. तासगाव तालुक्यातील मांजर्डे, आरवडे, बस्तवडे, सावळज, वायफळे, जरंडी आदी १६ गावांतील पाण्याचे २४ नमुने दूषित आल्याने संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविकांना पाणी शुद्धीकरणाबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाळवा, शिराळा, खानापूर, कडेगाव तालुक्यातीही पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. या गावामधील शाळा, अंगणवाडीसह ग्रामपंचायतींना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानस्वच्छ पाण्याबाबत नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. दि. १ डिसेंबर २०२२ ते दि. २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे आणि अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा, कॉलेज, हायस्कूल व सर्व शासकीय कार्यालयांतील पिण्यासाठी वापरात असणाऱ्या पाण्याचे पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी