वाटेगावच्या पैलवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:28 IST2021-05-21T04:28:21+5:302021-05-21T04:28:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे सुकुमार संभाजी जाधव (वय २१) या नामांकित पैलवानाचा विजेचा धक्का ...

Wategaon wrestler dies of electric shock | वाटेगावच्या पैलवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वाटेगावच्या पैलवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे सुकुमार संभाजी जाधव (वय २१) या नामांकित पैलवानाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने वाटेगाव परिसरात व कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लटके मळा येथे सुकुमार जाधव शेतात गेला होता. शेतात पोल्ट्री आहे. त्या ठिकाणी पोल्ट्री शेडचे काम चालू होते. त्या ठिकाणी सुकुमार लोखंडी अँगल उभा करत असताना अँगलचा धक्का बाजूनेच गेलेल्या ११ केव्हीच्या विजेच्या तारेला लागला. सुकुमारला जोराचा शॉक बसला. शरीरयष्टी बलदंड असल्याने प्रतिकार करता करता तो तिथेच कोसळला. ही घटना घडताच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी सुकुमारला ताबडतोब कऱ्हाड येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची तपासणी करून वैद्यकीय सूत्रांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.

सुकुमार याने अल्पावधीतच वाटेगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्ज्वल केले होते. महाराष्ट्र केसरीपर्यंत धडक मारण्याचा त्याचा मनसुबा होता. कै. पै. हिंद केसरी गणपतराव आंदळकर आबा यांचा तो पठ्ठा होता. न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर येथे सुकुमार शर्थीने तालमीचे धडे गिरवत होता. महाराष्ट्र केसरीचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने त्याच्यावर घाला घातला. त्याच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Wategaon wrestler dies of electric shock