शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी ३००० एकर डाळिंबबागा जतमध्ये वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:09 IST

भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील ३००० एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला

संख : भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील ३००० एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.                       

अनुकूल हवामान, कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी (जत), दरीकोणूर, वाळेखिंडी, काशिलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.

 तालुक्यात २६ पाटबंधारे व साठवण तलाव, २ मध्यम प्रकल्प आहेत. अनेक शेतकºयांनी तलावातून तसेच तलावाशेजारी ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून  पाणी आणले. मात्र यावर्षी ४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे १६ तलाव कोरडे पडले आहेत, तर संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृत संचयाखाली गेली आहे. 

पश्चिम भागातील तलावांना म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. सध्या तलावातील पाणीसाठा ६ टक्के शिल्लक आहे. हा साठा ३१४.४६ द.घ.ल.फू आहे. पूर्व भागातील अंकलगी तलाव वगळता सर्व तलाव चार महिन्यांपूर्वीच कोरडे पडलेले आहेत. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. 

जानेवारीपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डाळिंब बागांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे बागा पूर्णपणे वाळून गेल्याने फक्त सांगाडेच राहिले आहेत. परिणामी बागायतदारांसमोर बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी