शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अरे बाप रे....मगरीच्या जवळच पोहत होता, सुदैवाने बचावला; सांगलीतील घटना -video

By अविनाश कोळी | Updated: September 13, 2023 15:40 IST

नदीकाठावरील लोकांचा आरडाओरडा

सांगली : तल्लीन होऊन तो पोहत होता...दुसऱ्या बाजुने मगर त्याच्या दिशेने येत होती...नदीकाठावरील लोकांनी हे दृश्य पाहताच डोक्याला हात लावला. आरडाओरड सुरु झाली, पण पोहणाऱ्याच्या कानावर त्यांचा आवाज पोहचला नाही. पोहत तो मगरीजवळ गेला अन् साऱ्यांचा श्वास थांबला. मगर त्याला गिळणार की काय, असा विचार लोक करीत असतानाच मगर पाण्यात खोल गेली अन् तिच्यावरुन तो पुढे पोहत सुखरुप काठावर आला.सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर घडलेल्या या घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कृष्णा नदीत मगरींची संख्या कमालीची वाढली आहे. तरीही पोहणाऱ्यांनी, धुणे धुणाऱ्यांनी नदी सोडली नाही. त्यामुळे अनेकदा मगरीकडून लोकांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी सांगलीतील जलतरणपटू शरद राजदीप याच्यावर असेच मगरीचे संकट आले, पण नियतीने त्याला वाचविले. मगरीच्या अगदी तोंडासमोर पोहत जाऊन सुद्धा शरद राजदीप सुखरूपपणे बचावले. या घटनेचा नदीकाठावरील नागरिकांनी केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.सांगलीत कृष्णा नदीमध्ये असंख्य लोक दररोज सकाळी पोहायला उतरत असतात. जलतरणपटू शरद राजदीप हे सुद्धा रोज कृष्णा नदीतून पोहण्याचा सराव करतात. सांगलीच्या बायपास रस्त्यावरील नवा पूल ते बंधारा या भागात अजस्त्र मगरींचा नेहमीच वावर असतो. दररोज एक मगर त्या मार्गाने पाण्यातून फिरताना लोकांना दिसत असते. बुधवारी सकाळी शरद राजदीप हे कृष्णा नदीत सांगलीवाडीकडील बाजूने त्याच मार्गाने पोहण्याचा सराव करत होते. माई घाटाच्या जवळ शरद राजदीप पोहत येत असताना नेमक्या त्यांच्या विरुद्ध बाजूने एक अजस्त्र मगर येत असल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे राजदीप यांना सावध करून मार्ग बदलण्यासाठी लोक जोरजोराने आरडाओरडा करू लागले.

लोक इतके ओरडत होते की कोणीही सहज तो आवाज ऐकूनच गडबडले असते. मात्र कानात एअर प्लग घातलेला असल्याने आणि पाण्यात मान खाली घालून पोहण्याचा शरद राजदीप यांचा सराव असल्याने लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचलाच नाही किंवा आपल्यासमोर अगदी जवळ अजस्त्र मगर येत आहे याचा त्यांना पत्ताही लागला नाही. आपल्याच सरावात तल्लीन होत ते मगरीच्या जवळ जवळ जात राहिले. शेवटी त्यांच्या जवळ येताच मगर पाण्यात खाली गेली. त्यावरुन राजदीप पोहत निघून गेले आणि लाेकांनी सुटकेचा श्वास सोडला.

टॅग्स :SangliसांगलीSwimmingपोहणे